दिवेआगार हे अतिशय शांत रमणीय व आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. रायगड जिल्ह्यातील, श्रीवर्धन तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव.
इथले मुख्य आकर्षण म्हणजे ४-५ कि. मी. लांबीचा शांत समुद्रकिनारा. जिथे सकाळ संध्याकाळ तुमचा वेळ इतका शांत आणि छान जाईल की विचारु नका. कारण कुठल्याही प्रकारची अस्वच्छता किंवा दुकाने, फेरीवाले इथे दृष्टीस पडणार नाहीत. शांत वाळूवर पहूडायचे किंवा समुद्राच्या लाटांवर खेळायचे. इथला समुद्रही खूप शांत आहे आणि वाळू बिलकूल घसरत नाही, त्यामुळे भितीचे आजिबात कारण नाही. संध्याकाळी सूर्यास्त पहायला एक वेगळीच मजा येते. एवढया अथांग समुद्रात सुर्याचा लालबुंद गोळा बुडतानाचे ते दृष्य खरोखरीच अविस्मरणीय आहे.
इथले अजून एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे इथले सुवर्णगणेश मंदिर. या मंदिराजवळ श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळी पोफळीच्या बागेत जमिनीखाली खणताना एका तांब्याच्या पेटीत हा गणेशाचा सोन्याचा मुखवटा सापडला, जो त्यांनी गणेशमंदिर विश्वतांकडे सुपूर्त केला आणि त्याची स्थापना मंदिरात करण्यात आली. आणखी इथली एक वैशिष्टपुर्ण गोष्ट म्हणजे येथील रुपनारायण मंदिर. ज्याची एक ते दीड मीटर उंचीची दुर्मिळ मूर्ती येथे पाहायला मिळते
===============
आता लवकरच दिवेआगार ला जाण्यासाठी एक ट्रिप अरेंज करा… ड्राईव्हर ची चिंता करू नका…
आपल्या परिसरातील कार ड्राईव्हर्स शोधण्यासाठी DriversFind.in वेबसाईट ला भेट द्या