रतनगड हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३६०० फुट आहे.
कसे जाल ?
गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.
इतिहास
१७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली किल्लेदार गोविंदराव खाडे हे महादेव कोळी शेवटचे किल्लेदार होते. पुढे इंग्रजांचा विरुद्ध उठावात आदिवासी सेनानी राघोजी भांगरेनी गड ताब्यात घेतला.
किल्ल्याला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक हे चार प्रवेशद्वार आहेत
किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर आहे.
गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे –
१ – गणेश दरवाजा.
२ – रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ – मुक्कामाची गुहा.
४ – प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ – इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ – कडेलोट पॉइंट.
७ – राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ – प्रवरेचे उगमस्थान.
९ – मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० – अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ – नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
११ – कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
रतनगडाच्या जवळच इतरही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
साम्रद येथी सांधण, कोकणकडा, भंडारदरा धरण, अमृतेश्वर मंदिर इत्यादी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.
===============
आता लवकरच रतनगडावर जाण्यासाठी एक ट्रिप अरेंज करा… ड्राईव्हर ची चिंता करू नका…
आपल्या परिसरातील कार ड्राईव्हर्स शोधण्यासाठी DriversFind.in वेबसाईट ला भेट द्या